|
मराठी चित्रपटांना खूप जुनी परंपरा आहे... आणि पूर्वी काही चित्रपट खूप मजेशीर असायचे, जसे की १. शिवाजी महाराजांचे type - सूर्यकांत चंद्रकांत यांचे शिवाजी महाराज, बहिर्जी, मांसाहेब... २. लक्ष्या, अशोक सराफ़, महेश कोठारे - काही खूप छान होते, कधी कधी पकवलं solid ३. गावचे पाटिल (निळू फ़ुले), लावणी, गरीब बिच्चारा शेतकरी, देखणी बायको, फ़टफ़टीवर फ़िरणारे तरूण ४. रमेश देव, सीमा type शहरी ५. रडके - ताईच्या बांगड्या, इत्यादी ६. काही छळपट - माहेरच्या साड्या/ बांगड्या/ गायी, आणि तत्सम.....
सद्ध्या खरंच दर्जेदार चित्रपट येत आहेत... काही उत्तम चित्रपट: १. १० वी फ़ २. निवडुंग (Hridaynath चं संगीत) ३. संत तुकाराम ४. एक डाव भूताचा (अशोक सराफ़ चा मावळा सही होता. खूप वेळा रविवारी हा movie लागेल अशी अफ़वा असायची, आणि "दूर"दर्शन निराशा करायचं...) ५. थरथराट - चांगला प्रयत्न होता ६. श्यामची आई ७. सैल (दिग्दर्शन: गजेंद्र अहिरे, संगीत: Hridaynath) - बघायचाय अजून (गाणी आहेत का कोणाकडे? desparately searching) ८. कळत नकळत (विक्रम गोखले, अश्विनी भावे, अशोक सराफ़) ९. सर्जा (बाबासाहेब पुरंदरेंच्या "शेलारखिंड" या amazing कादंबरीवर आधारीत - अजिंक्य देव होता त्यात) १०. पिज़रा ११. सिंहासन: जब्बार पटेल दिग्दशि॔त सिंहासन राजकारणावर आधारीत चित्रपट आहे. सत्ताकेद्रित नेते लॊकांचे सद्द स्थितीतही लागु हॊणारे यथाथ॔ चित्रण... अरूण सरनाईक, श्रीराम लागु आणि निळु फुले यांचा सुरेख अभिनय.. अरूण सरनाईकांसारख्या सक्षम अभिनेत्याने वठवविलेला "मुख्यमंत्री जिवाजीराव", निळूफुलेंनी साकार केलेला हतबल पत्रकार "दिगू टिपणीस", सरड्यासारखा रंग पालटणारा कामगार नेता "डिकोस्टा", नाना पाटेकरने सादर केलेला दिशाहीन आणि गुन्हेगारी मार्गाला लागलेला तरूण, ह्या सर्व पात्रांनी या चित्रपटाला अजरामर केले आहे. राजकीय सत्ता आणि विशेषतः मुख्यमंत्रीपद यासाठी होणा-या नेत्यांच्या चढाओढीमध्ये सामान्य माणसाची होणारी ससेहोलपट, समाजाचे कधीच न सुटू शकणारे प्रश्न आणि लोकांची संकुचित मानसिकता याचे एका प्रामाणिक पत्रकाराच्या दॄष्टिकोनातून केलेले वास्तववादी चित्रण म्हणजे "सिंहासन"
१२. श्वास १३. तू तिथे मी १४. उत्तरायण १५. बनगरवाडी १६. वजीर - अशोक सराफ़ आणी विक्रम गोखले १७. देवराई १८. चौकट राजा १९. सवत माझी लाडकी २०. सरकारनामा २१. पक पक पकाक २२. रात्रारंभ २३. अशी ही बनवा बनवी २४. सातच्या आत घरात २५. सिंहासन २६. बिनधास्त २७. अनाहत २७. मुक्ता
२८. राष्ट्रपती पुरस्कार विजेता "जैत रे जैत" कथा: गो. नी. दाण्डेकर यांच्या उत्क्रुष्ठ मूळ कादंबरीवर आधारीत कथेचं दिग्दर्शन केलं होतं जब्बार पटेल यांनी. कलाकार: मोहन आगाशे, स्मिता पाटील Hridaynath यांचं अद्वितीय संगीत, ना.धो.महानोर यांचे शब्द संगीताच्या वाटेनं खूप वेगळी हाताळणी केली होती चित्रपटाची फ़क्त कादंबरीपेक्षा शेवट का बदलला हे नाही पटलं.
आणि इतरही बरेच...... परत सगळे सगळे बघावेसे वाटताहेत! 
|